आमच्या विषयी

"उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत ! अर्थात उठा , जागे व्हा , लक्ष प्राप्त होईपर्यंत थांबू नका , तो पर्यंत मागे वळून पाहू नका , हा मंत्र घेऊन मराठा समाजाच्या उन्नतीच्या, समृद्धीच्या , विकासाच्या महान कार्याचा वसा समविचारी मराठा उद्योजकांनी मराठा क्रांती मूक मोर्चानंतर घेतला. त्याचीच परिणीती म्हणून शिवजयंतीच्या दिवशी , १९ फेब्रुवारी २०१७ रोजी मराठा उद्योजक सेवा संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.

मराठा क्रांती मूक मोर्चाच्या निमित्ताने प्रचंड मोठ्या प्रमाणात विखुरलेला मराठा समाज एकत्र आला असला तरी त्याची एकत्रित नोंदणी असण्याची गरजही अधोरेखित झाली . तसेच मराठा समाजातील व्यावसायिक हे विविध क्षेत्रांमध्ये काम करीत असल्यामुळे, या सर्व व्यावसायिकांची संपूर्ण माहिती उर्वरित समाजबांधवांना एकच ठिकाणी मिळण्यासाठी या सर्वांची एकत्रित नोंदणी करण्यासाठी डिरेक्टरी काढण्याचे कार्य संस्थेने हाती घेतले आहे . जेणेकरून त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विखुरलेल्या तसेच वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या समाजबांधवांची संपूर्ण माहिती , समाजातील इतर समाज बांधवांपर्यंत पोहोचवून जास्तीत जास्त कामाच्या संधी सर्व समाजबांधवांना उपलब्ध होतील , कुठल्या क्षेत्रात समाज मागे आहे त्याचा मागोवा घेता येईल , समाजातील युवकांना उद्योगातील प्राधान्यक्रम ठरविण्यास मदत होईल , एवढा मोठा समाज हा समाजाच्या उद्योजक तरुणांसाठी उत्प्रेरक ठरेल , आणि त्याद्वारे सकल मराठा समाजाचा सामाजिक , शैक्षणिक व व्यावसायिक विकास घडवून आणणे शक्य होईल .

वरील समाज विधायक हेतूने सुरु झालेल्या कार्यात आम्हास संस्थेच्या माध्यमातून खारीचा वाटा उचलण्याचा योग प्राप्त झाला आहे हे आम्ही आमचे भाग्यच समजतो , आपणही संस्थेने हाती घेतलेल्या सकल मराठा बिझनेस डिरेक्टरीच्या कामात तन मन धनाने समाज बांधव ह्या नात्याने हातभर लावावा ही आग्रही विनंती.