"उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत ! अर्थात उठा , जागे व्हा , लक्ष प्राप्त होईपर्यंत थांबू नका , तो पर्यंत मागे वळून पाहू नका , हा मंत्र घेऊन मराठा समाजाच्या उन्नतीच्या, समृद्धीच्या , विकासाच्या महान कार्याचा वसा समविचारी मराठा उद्योजकांनी मराठा क्रांती मूक मोर्चानंतर घेतला. त्याचीच परिणीती म्हणून शिवजयंतीच्या दिवशी , १९ फेब्रुवारी २०१७ रोजी मराठा उद्योजक सेवा संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. मराठा क्रांती मूक मोर्चाच्या निमित्ताने प्रचंड मोठ्या प्रमाणात विखुरलेला मराठा समाज एकत्र आला असला तरी त्याची एकत्रित नोंदणी असण्याची गरजही अधोरेखित झाली . तसेच मराठा समाजातील व्यावसायिक हे विविध क्षेत्रांमध्ये काम करीत असल्यामुळे, या सर्व व्यावसायिकांची संपूर्ण माहिती उर्वरित समाजबांधवांना एकच ठिकाणी मिळण्यासाठी या सर्वांची एकत्रित नोंदणी करण्यासाठी डिरेक्टरी काढण्याचे कार्य संस्थेने हाती घेतले आहे.
प्रकार | देणगीमुल्य |
---|---|
नॉर्मल लिस्टिंग | २००/- |
ठळक लिस्टिंग | ४००/- |
स्पेशल लिस्टिंग | ८००/- |
प्रकार | देणगीमुल्य |
---|---|
१ / ८ पान | १५००/- |
१ / ४ पान | ३०००/- |
१ / २ पान | ६०००/- |
संपूर्ण पान | १०,०००/- |
२५ पानांवर स्ट्रीप | २५,०००/- |
Copyright 2019 Maratha Udyojak Seva Sanstha, Nashik. All Rights Reserved.